Sunday, December 04, 2005

ओढ

ओथंबलेल्या मेघांना धरतीची,
दुखावलेल्या अश्रूंना सांत्वनाची,
फेसाळलेल्या लाटांना किनाऱ्याची,
चिमुकल्या पंखांना भरारीची,
दवबिंदूंना किरणांच्या सोन्याची,

तशीच,

मला तुझी --- ओढ

No comments: