Tuesday, May 24, 2005

काय?

हा प्रश्न मला जेव्हा कुणितरी विचारला, तेव्हा कुठे मला असा प्रश्न अस्तित्वात असू शकतो याची जाणीव झाली.

"तू मला का आवडतेस?" असं मला विचारलं गेल्यावर माझी तर झोपच उडाली.

असा प्रश्न कुणाला, का पडावा, असं स्वत:ला विचारता विचारता मी उत्तराचा विचार करू लागलो - पण ते सापडेना!

होतं अनेकदा असं - उत्तराच्या शोधात असताना उत्तरादाखल एक नवा प्रश्नच उमटतो - आणि तो असतोही अचूक!

"तू मला का आवडतेस या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या शब्दांत देऊ शकलो असतो, तर तू खरोखर मला आवडतेस असं मी म्हणू शकलो असतो का?"

अत्यंत आत्मविश्वासाने मी प्रश्नकर्त्याला उत्तर दिलं - जाणवलं, की प्रश्नकर्ता दुसरा कोणी नसून माझंच मन होतं!

असा प्रश्न विचारण्याचं आणि स्वत:चं संपूर्ण समाधान व्हावं असं उत्तर देण्याचं समाधान मिळवण्याचं भाग्य माझं; आणि फक्त माझं होतं!

No comments: