Sunday, May 22, 2005

काही गोष्टी आयुष्यात फारच महत्त्वाच्या असतात - दुर्दैवाने, त्या जेव्हा घडत असतात तेव्हा त्याचे महत्त्व जाणवतेच असे नाही.

तीन वर्षांपूर्वी मी पुण्यातलं शिक्षण संपवून इथे बंगलोरास आलो. Campus Interview मधून मला जर Texas Instruments ची नोकरी मिळाली नसती तर? ते जाऊ द्यात, बारावीत असताना चांगले marks मिळाले नसते तर? - आणि तत्पूर्वी...? आयुष्याच्या रेलगाडीची दिशा ठरवणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. महत्त्वाच्या junctions वर कुठला track निवडायचा हे ठरवणारे हे निर्णय, ह्या achievements! प्रत्येक टप्प्यावर असे अनेक पर्याय उभे - त्यात मी निवडलेल्या पर्यायांतून माझी अशी घडण घडत गेलेली आहे. आता कुठला टप्पा महत्त्वाचा आणि कुठला दुय्यम हे कसे ठरवायचे? माझ्या एका खूप जुन्या कवितेत मी लिहिलं होतं -

आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर मागे वळून पाहताना,
मीच मला दिसलो-
आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर मागे वळून पाहताना...

प्रत्येक टप्प्यावर जर वेगळ्या घटना घडल्या असत्या, तर आज मी मला जसा दिसतोय- मी जसा जगतोय तसाच जगलो असतो का?

लहानपणी नजर फार दूरपर्यंत पोहोचू शकत नाही - दोन-तीन वर्षांपलिकडचे जग ते कोवळं मन imagine करू शकत नाही. निदान माझ्या बाबतीत तरी ही गोष्ट खरी आहे. याला कदाचित 'महत्त्वाकांक्षेचा अभाव' असं संबोधलं जाण्याची शक्यता आहे - पण माझा त्यास आक्षेप नाही. माझे स्वत: आखून घेतलेले milestones एक-दोन वर्षांपलिकडे extend होत नाहीत. कदाचित त्यामुळेच मी बदलत्या conditions मध्ये पटकन adapt करू शकत असेन.

IISc तली दोन अत्यंत मौल्यवान वर्षं आता संपत आली आहेत; आणि एक टप्पा संपतोय - दुसऱ्याच्या आगमनाची वार्ता आणत. बदल नेहमीच चांगल्या गोष्टी घेउन येत असतो - आणि त्याचेच आता मला वेध लागले आहेत.

No comments: