Thursday, April 28, 2005

हरवले ते...

Third Year मध्ये असताना बसने पुण्याहून नाशिकला घरी जाताना माझी एक sack चोरीला गेली. sack मध्ये तश्या बऱ्याच गोष्टी होत्या : एक jacket, calculator, एक दोन पुस्तके, आणि एक पेन.

बाकी सगळ्या गोष्टी गेल्या असत्या तरी चालले असते, पण ते पेन - अरे रे !

अकरावी, बारावी, आणि मग नंतर engg. ची तीन वर्षे, प्रत्येक परीक्षा मी त्याच पेनाने लिहिली होती. Hero चं होतं ते, silver रंगाचं. आठवतंय मला, ४० रुपये किंमत होती त्याची! चीनी पद्धतीची बारीक, छान नक्षी असलेली body, सोनेरी रंगाची नीब - मला आवडते तशी - रूंद, चांगले भरीव-जाड अक्षर उमटायचे त्यातून. दिवसांबरोबरच ती नक्षी हळूहळू लोप पावली, पण नीबेचा रुबाब कायम राहिला. आणि त्याचबरोबर माझा परीक्षांमधला performance सुद्धा.

जवळच्या अनेक गोष्टी अशा प्रिय झालेल्या असतात. सरावाच्या झालेल्या असतात. आणि अशी बसलेली घडी अचानक मोडली, की कसेसेच होते. तेच पेन जर माझ्या हातून पडून retire झालं असतं तर? कदाचित मी त्यास इतके miss केले नसतेही. निदान ते माझापाशी तरी राहिलं असतं... Dramatic भाषेत लिहायचं तर, "...आता उरल्या त्या फक्त आठवणी".

त्यानंतर तशी बरीच पेने वापरली. IISc तल्या पहिल्या semester च्या उज्ज्वल यशानंतर खूष होऊन मग मी स्वत:लाच एक parker बक्षीस म्हणून घेउन दिले. माझे अलिकडचे सगळे लेखन त्या parker नी उतरवलेले आहे. मनात येणाऱ्या विचारांसारख्या काही गोष्टी फक्त स्वत:च्या असतात. आणि विचारांसारख्याच मौल्यवानही. एखादा विचार अवेळी हरवावा आणि अनंत प्रयत्न करूनही परत आला नाही की जसे दु:ख होते, तसेच मला हे पेन हरवल्यानंतर झाले. हरवले ते हरवलेच. "नकळत..." मधला एक संवाद उसना घेतो : "त्याच्यासारखं पेन शोधून सापडायचं नाही. खरंय ते. अजून सापडलेलंच नाहिये ना..."

ते पेन हरवल्यानंतरची पहिली परीक्षा देतानाची धकधक आणि धाकधुक अजूनही मला आठवतेय :)

No comments: