Tuesday, April 26, 2005

शिवाजी महाराजांचे फोटो!

sub: chh. shri. shivaji maharaja's photographs

असा e-mail चा subject वाचून मी फार मोठ्या उत्सुकतेने e-mail उघडली. सोळाव्या शतकात फोटोग्राफीचे तंत्र विकसित झालेले नव्हते अशी माझी खात्री होती. तरीही असे 'फोटो' कोणाला मिळाले ते पहावे म्हणून बघतो तर काय, शिवाजी महाराजांच्या (कल्पना) चित्रांचे ते फोटो होते, आणि एक तर चक्क रायगडावरच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपतींचा!

फोटो आणि चित्र यांत फार मोठा फरक असतो हे त्या बिचाऱ्या e-mail लेखकाच्या ध्यानात आले नसावे.

---

"नकळत सारे घडले..." च्या तालमीच्या वेळेचा एक किस्सा:

"कोणाचा फोने होता? पल्लवीचा ना? फार `काव' आणला आहे बघ तिनं.. सारखी आपली फोन करत असते..."

असा मूळ संवाद होता. मी विचार केला, की जर मुलीचा फोन होता, आणि सगळा reference मुलीचा आहे, तर "फार `चिव' आणली आहे बघ तिनं" असा तो संवाद घ्यायला काय हरकत आहे?

प्रत्येक तालमीच्या वेळी मग आम्हाला हा किस्सा हमखास हसू आणायचा!

एक अजून संवाद होता - "मग तर त्यांनी भगवी कफनीच धारण केली, पूजा-आर्चा, आरत्या-नैवेद्य, काकबळी...", एका practice च्या वेळी काकांनी त्या संवादात, काकबळींबरोबरच भूकबळीही add केले होते :)

"सिंहानं डरकाळी फोडली, की झाडावरची माकडं 'टपाटप' खाली पडतात" असा संवाद होता- काका नेहमी तो संवाद, "माकडं 'पटापट' खाली पडतात" असा घ्यायचे. मी म्हणालो, काही हरकत नाही, हा फक्त big-endian आणि little-endian data storage चा problem आहे. तिथले बरेचसे गडी electronics/CS background चे असल्याने हा विनोद झटक्यात appeal झाला!

No comments: