ही शुभ्र शिडाची नाव
झोकात चालली पुढे
वारा शिखांत, पाण्यात अन
रेखा कापऱ्या सोडे
उत्श्रुंखल निळ्या लहरींचे
निनादे गगनात गाणे
कुठे क्षितिजावर एकाकी
सागरपक्ष्याचे आतूर तराणे
विशाल सागर पुढे तियेच्या
क्षितिजास नसे तिच्या किनारा
जावे कुठेही, कुठेही रमावे
थांबावे मग थकता वारा
कविता आणखी काय वेगळी,
असे का निराळी तिची चाल?
संथ निळ्या पटलावरती
शुभ्र मोत्यांची मोहक माळ
प्रतिभेचे प्रचंड शीड फुगवे
तट्ट, कल्पनेचा भन्नाट वारा
शब्द आणखी कापत जातसे
छेडित मनांच्या मंजुळ तारा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment