Thursday, June 24, 2004

काय हे!
चंद्रा, अरे तुला काय म्हणावे?
धरतीवरचे प्रेम तू असे गुरुत्वाकर्षणावर ढकलावे?
पुनवेच्या रात्री सागर उचंबळून यावा
पण त्यास तूच परत सारावे?

भले प्रियकरांनी तुझेच सदॆव भाट व्हावे
तू मात्र संपूर्ण दर्शनासाठी एवढे तिष्ठत ठेवावे?
चिमुकल्यांनी मामाला रोज असे बोलवावे
तू मात्र रात्रीचे पांघरूण लेऊन शांत खुशाल निजावे?

राजबिंडा राजकुमार तू, तरीही इतके लाजावे?
वसुंधरेच्या मागे-पुढे खुशाल तू फिरावेस
सूर्याच्या तेजाला रात्री लाजवतांना
आपले मुख मात्र आम्हांस अर्धेच दाखवावे?

- कोजागिरी पौर्णिमा (९/१०/२००३)

No comments: