Wednesday, December 07, 2005

काळ्या पाण्याची शिक्षा

दर पंधरा-एक दिवसांमागे एकदा मला ही काळ्या पाण्याची शिक्षा होतच असते. तसाच गंभीर गुन्हा घडला तर दर पंधरा-एक दिवसांमध्ये दोनदाही ही सजा ठोठावली जाऊ शकते. अर्थात ती सजा घ्यायला अंदमानला वगैरे जावं लागत नाही. विचारही क्रांतिकारक असावे लागत नाहीत. तुम्ही (माझ्यासारखेच) मवाळ विचारसरणीचे असलात तरी हरकत नाही. घरच्या घरी, अगदी गाणी ऐकता ऐकता या सजेचा "आनंद" तुम्ही मनसोक्त घेऊ शकाल.

पाच (वापरलेले) कपडे घ्या. योग्य प्रमाणात detergent पाण्यात घाला, भरपूर फेस येउद्या पाण्याला, नंतर हाताने पावडर पूर्ण विरघळलेली आहे की नाही ते पहा, मग त्या बादलीभर पाण्यात ते मळलेले कपडे भिजवा. [किमान] अर्धा तास इकडे तिकडे करून झाल्यावर, आता आपण सजेस सज्ज आहात. त्यानंतर मग बाथरूमला (आतून) कडी लावून घ्या. आवडते गाणे रेडिओवर किंवा आपुल्याच कंठी आळवायला सुरूवात करा. भिजलेले कपडे पाण्यातून एकेक करून बाहेर काढा. तुमची काळ्या पाण्याची शिक्षा पार पडलेली तुम्हाला बादलीत दिसेल!

No comments: