Tuesday, November 29, 2005

आपली संध्याकाळ

तो निळा गहिरा जलाशय.
वाऱ्याने विस्कटून टाकलेली पाण्याची घडी.
तळ्याच्या काठाकाठाने जाणारी एकटीच वाट.
लहरींना समांतर बगळ्यांची लगबग.
आणि निवांत बदकांची क्षितिजावर सहल.
हेलकावणाऱ्या पाण्यात थिरकणारे प्रतिबिंब.
अस्ताला आलेली सोनेरी संध्याकाळ.
किनाऱ्यावरच्या झाडांवर अधीरशी सळसळ.
तू उडवलेल्या पाण्याचे गार-गार तुषार.
तुझं ते स्मित...

... आणि मनांत उमटलेले अनंत तरंग.

No comments: