IISc मधून आता इंदिरानगरातील घरी येऊन आता तसा महिना होत येईल (खरं म्हणजे यातले दोन आठवडे trek निमित्ताने घराबाहेरच होतो), तरीही IISc तल्यासारख्या हरितजीवनाशी अजूनही संबंध आहेच. म्हणजे झुरळे, पाली इत्यादी (मुके? बिचारे?) जीव आमच्या घरी निर्भयपणे वावरताना दिसतात. त्यात या रविवारी एका सापाची* भर पडली. घरी साप सापडला♣!
या सापावरून त्यानंतर कोट्यवधी कोट्या झाल्या असतील. या सापास हाकलून दिल्यानंतर त्याची साप-सफाई झाली असं एक मत पुढे आलं. "आपण साप पाळला आहे", याचं हिंदी भाषांतर "हमने साप पाला हैं" असं झालं. हमने "साप को पाल पोसके बडा किया" यात सापाला बडा किया की पालीला यामध्ये संभ्रम निर्माण झाला.
आता हिच हकिकत internet वर post केल्यानंतर, ही एक e-साप-नीती ठरते आहे!
---
* सापाची अंगकाठी अत्यंत काटकुळी होती. खरं सांगायचं तर ते सापाचं एक पिल्लू होतं. तर्जनीच्या लांबीएवढं आणि साधारणत: पेनाच्या refill च्या जाडीचं. परंतु बच्चा बहुत होशियार होता. Hopefully सापीणबाईंनी अजून पिल्ले आमच्या घरात आश्रयास ठेवली नसावीत.
♣ तमीळमध्ये जेवणाला "सापड" असे म्हणतात :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment