Wednesday, June 08, 2005

दोन मोती

सकाळ झाली. प्रचंड उत्साह.
समुद्रावरच्या लाटा. फेसाळलेला किनारा.
वारा धावतोय. नारळ डोलताहेत.
मधूनच झुळूक. पावले चालतात.
लाटा विसावतात. वळून पाहतो.
खुणा विझतात. क्षितिजावर बोटी.
मनात कल्पना. आठवणींचा ठेवा.
पुन्हा झुळूक. चंदेरी फेस.
सोनेरी वाळू. नारळ सरले.
खेकडे पळाले. अनंत थेंब.
एक सागर. सोनेरी मेघ.
शिंपल्यांचा खच. शंखांचा खच.
पुढे मागे. सूर्याचे तेज.
पाण्याचा गारवा. चमकत्या लहरी.
मनात कल्पना. अनावर आठवणी.
दोन शिंपले. अजून जपलेले.
अप्रतिम नक्षी. अप्रतिम सौंदर्य.
आणखी शिंपले. आणि मोती?
ते कशाला? तुझे नाव.
तुझ्या आठवणी. सुसाट वारा.
खारा किनारा. मनात भरारा.
उसळत्या लाटा. लखलखती वाळू.
वाऱ्याची शीळ. सागराची गाज.
मनाला भास. तुझा आवाज?

दोनच शिंपले. आता मोती!

No comments: