Thursday, June 02, 2005

धागा

अरबी समुद्राच्या त्या विशाल सागरकिनाऱ्यावर
        रात्रीच्या नीरव शांततेत आणि लाटांच्या गंभीर गाजेत
ताऱ्यांच्या पिठूरलेल्या बहरात, वाऱ्याच्या शीतल झुळुकेत
        रूपेरी वाळुच्या थंडगार स्पर्शाचा अनुभव घेत
पहुडलेलो असताना - माझा तुझ्याशी संपर्काचा एकच धागा होता
        मला खात्री होती - चंद्राच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू
आपल्या मनांचे नि:शब्द संवाद ऐकूनच इतकं खुललेलं होतं- किंवा कदाचित
         मला फक्त प्रतिबिंब दिसत होतं - फक्त काहीशे मैलांवरच्या द्रुष्याचं?

No comments: