Tuesday, May 10, 2005

सूर मनातले

तुझ्याच आठवणींची ही अशी गर्दी
               मनात माझ्या आज अशी झालेली
सुसाट वाहताती सूरांच्या लयी मात्र
                शब्दांच्या दूतांची पुरी कोंडी झालेली.

त्या स्वरांच्या मधुर ताना आक्रमक,
     घेता समजावून तेव्हा नकळत
अनावर अखेर शब्द माझे झाले
                 आणि, सूर मनातले कागदावर सांडले!

No comments: