Wednesday, May 04, 2005

वाटतं

तुला मी पूर्णपणे कधी समजेन का?
मला नाही वाटत
मी मला २४ वर्षांपासून पाहत आलो आहे.
आणि मला नाही वाटत
मी स्वत:ला पूर्णपणे समजू शकलो आहे.
पण मला नाही वाटत
सगळ्या गोष्टी पूर्णपणे समजायलाच हव्यात
मला नाही वाटत
वाटा सगळ्या स्वच्छ दिसाव्यात
कधीकधी वाटतं
काही गोष्टी अंधुकच छान दिसतात
वाटतं
मीमांसा न करण्यातच अधिक जाणणं आहे
कधीकधी
काही गोष्टी अव्यक्तच ठेवण्यात गंमत आहे
मला नाही वाटत...
तुला मी पूर्णपणे कधी समजेन
आणि अर्थातच
मीही तुला पूर्णत: समजू शकेन
पण कदाचित
याच एका आशेवर - रोज निराळे रंग शोधताना
आणि
रोज निराळे सूर ऐकताना- वाटतं
वाटतं
याहून मोठं भाग्य ते काय असावं
सदैव मी
तुझ्याच विचारांत असताना!

No comments: