Sunday, April 17, 2005

reply तुझा!

इतक्या उत्कटतेनं मी लिहिलेल्या तीन-चार पानी e-mail ला तुझं चारच ओळींचं उत्तर आलं!

माझ्या विचारांना तुझ्याच ध्यासाचं वेड होतं - आवेगात त्या न जाणे मी काय काय लिहिलं...

खरं खरं सांगतो, जे लिहिलं ते सच्चं मनच होतं माझं, तुझ्यापुढे खुलं केलेलं...

तुझ्या त्या reply मध्ये माझे शब्द मात्र दिसले नाहित मला आणि मन नाचत सुटलं...

ते शब्द सुंदर भावले इतके तुला - मोती माझे स्वीकारुनि उत्तर तू ते धाडलं !

No comments: