Saturday, January 22, 2005

जिंकेल जो मना । त्यास खेळाडू माना ॥

मागचा आठवडा badminton tournament च्या "धावपळीत" कसा गेला ते कळलेच नाही. मी या tournament कडे विशेष डोळे लावून होतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून सुट्टीचे अपवाद वगळता माझी जवळजवळ रोज practice चालली होती. मी काही top चा player नाही; पण बाकीच्या खेळांप्रमाणे या खेळातही मी अगदीच novice ही नाही. गेल्या वर्षीच्या tournament मध्ये १०-१५ दिवसांच्या practice नंतर मी ३र्या round मध्ये चांगली लढत देउन हरलो होतो. याही वर्षी luckily तोच opponent मला pre-quarter finals ला भेटणार होता (जर मी तिथपर्यंत पोहोचलो असतो तर!). पहिले दोन rounds फारच सोपे होते, तिसर्या round ला मला ९४ rounds धावलेला atheletics champion प्रतिस्पर्धी म्हणून लाभला. पण त्याने मला पळवण्यापेक्षा स्वत:च पळणे पसंत केले आणि मी पुढच्या round मध्ये पोहोचलो. आता best-of-three match होती, आणि opponent सुद्धा तीन rounds नंतर आलेला असल्याने बर्यापॆकी graceful होता. थोड्याश्या probing नंतर मी त्यास पूर्णत: "घेतला", आणि गेल्या वर्षीच्या repeat-match साठी तयार झालो.

माझ्या अपेक्षेप्रमाणे माझ्या opponent चा खेळ खूपच सुधारलेला होता, आणि मी पूर्णत: निष्प्रभ ठरत होतो. पहिला game मला कळायच्या आतच १५-४ असा हरून बसलो! दमछाक झाली. दुसर्या game मध्ये do-or-die च्या त्वेषाने खेळून ९ points पर्यंत game नेला. हरावे तर अशा opponent शी! या समाधानाने मी court सोडले. इतक्या कमी वेळात इतका जास्त घाम मला याआधी कधीच आला नव्हता - आणि हरल्यानंतरही मनात इतके समाधान घेउन मी कधीच परतललो नव्हतो.

परवा बक्षिस समारंभ होता. यावर्षीचे best performer चे बक्षिस मला (विभागून) मिळाले. हे अगदीच अनपेक्षित होते. शरिराला व्यायाम मिळावा या साध्या हेतुने सुरु केलेल्या badminton (जो माझा "primary" खेळ नाही) मध्ये मला हे बक्षिस मिळेल असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. पण एकंदरीत tournament चा आढावा घेता, jury ने कदाचित "जिंकेले जो मना । त्यास खेळाडू माना॥" असे धोरण अवलंबले असावे. या बक्षिसाने मला आनंद तर झाला आहेच, पण महत्वाचे म्हणजे एक मोठा confidence मिळवून दिला आहे. आणि मागे एकदा म्हणालो होतो तसे - "नित्य खेळ मांडा । अजित म्हणे ॥" - खेळ मांडण्यासाठी खूप मोठा हिरवा कंदिल दाखवला आहे!

No comments: