Sunday, January 30, 2005

मी एक गणितद्न्य

मी या जगाकडे एक समीकरण म्हणून पाहतो. (x,y,z,t) या चार co-ordinates मध्ये घडणारा life हा एक process आहे. माझे एका ठिकाणी असणं याची probability p(x,y,z,t) असेल, तर मी दुसर्या एका वेळी (t1) तिथेच असण्याची शक्यता किती? अशा प्रश्नांची उत्तरे अवघड खरी, पण पूर्ण माहिती पुरवल्यास (आणि पुरेसा वेळ दिल्यास) हे life चे गणित सुटु शकेल याची मला खात्री आहे.

एक coin उडवल्यास head आणि tail मिळण्याची शक्यता आपण दोनात एक आहे असे म्हणतो; पण जिथे toss केला आहे तिथल्या गुरुत्वाकर्षणाचे constants, वातावरणाच्या conditions आणि toss करतानाचे mechanics याचे पुरेसे आकडे पुरवल्यास head पडेल की tail याचे खरे भाकित करता येइल - नक्कीच!

सध्या मात्र मी ही समिकरणे निराळ्याच boundary conditions साठी सोडविण्याचा प्रयत्न करतो आहे - हो आणि पुरेशा computational power च्या अभावी ठोकताळे (ad-hoc methods) चा आधार घेतो आहे. प्रश्न हा आहे, की माझी आणि एका व्यक्तीची भेट होइल का, दिवसातून किती वेळा दर्शन होइल आणि (हा प्रश्न computationally involved आहे - sub-exponential soultion दिसत नाही) मी / ती व्यक्ती काही बोलेल का ते ;-)

No comments: