Thursday, October 07, 2004

सांग तू स्वप्नात येशील का?

सगळ्या वाटा अचानक लुप्त का व्हाव्यात?
सगळ्या दिशा अंधार्या का वाटाव्यात?
अशा वेळी सांग तू स्वप्नात येशील का?

तो पहाड अजस्र दुर्लभ का वाटावा?
स्वत:वरचा विश्वास अचानक का ढळावा?
अशा वेळी सांग तू स्वप्नात येशील का?

एकच शब्द तुझा - असेना का स्वप्नातला-
पाउस त्याने बरसून टाकावा -
मातीच्या ओल्या गंधाने
मनाचा आसमंत सुगंधित व्हावा ---
हव्याहव्याश्या मेघ-मल्हारासाठी सांग,
तू स्वप्नात येशील का?

सगळ्या वाटा स्वच्छ दिसाव्यात
दाही दिशा झगमगून जाव्यात
निदान माझ्या मागल्या स्वप्नभेटीची
परतफेड म्हणून तरी सांग,
तू स्वप्नात येशील का?

No comments: