Saturday, September 04, 2004

फूल बूचाचे

सप्टेंबर महिना आणि बूचाची फुले यांचं अतूट नातं आहे. IISc च्या रस्त्यांवर पडलेला सुगंधी सडा मला नाशिकच्या जुन्या आग्रा रोडची आठवण करून देतो. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना ही जुनी झाडे आहेत. आई-बाबा मला सांगायचे, की मी जेव्हा अगदी बाळ होतो तेव्हा ते दोघे मला घेउन त्या रस्त्यावर फिरायला जायचे - रस्ता बूचाच्या फुलांनी फुलून गेलेला असायचा आणि मी आईच्या कडेवर शांत झोपी गेलेलो असायचो!

अर्थात ही सगळी ऎकीव "आठवण" आहे. पण कदाचित इतक्या लहानपणी अनुभवलेला गंध इतका impact करुन गेला असावा, की कुठेही बूचाची फुले दिसली, की पुलंच्या "कामतमामां"प्रमाणे मला आमच्या नाशिकची आठवण होते!

No comments: