Saturday, July 31, 2004

आलो परत!

जवळजवळ तीन आठवड्यांची प्रदीर्घ सुटी (कशी-बशी) संपवून आज अस्मादिक बंगलोरी परतले. सततच्या कामातून एवढी मोठी रजा मिळाल्यावर थोडक्यातच कंटाळा नसता आला तरच नवल. आता परत आल्यानंतर पुन्हा हळूहळू जम बसविण्यास थोडासा अवधी लागणे अपेक्शित आहेच. नवे विषय आणि नवे शिक्शक, नवे timetable यांत रुळायला थोडाफार वेळ हा लागणारच.

सुटीचा, आळसाचा mood जाउन आता नवा उत्साह सळसळू दे - त्यासाठी हे गाणे :

या भवनातील गीत पुराणे - मवाळ हळवे सूर जाउ द्या आज येथूनि दूर
नवे सूर अन नवे तराणे - हवा हवा तो नूर

या भवनातील गीत पुराणे ...

No comments: