Friday, June 25, 2004

॥ काल ॥
--------------------------------
अनंत नि अनेक जीव आणि निर्जीव
जगती या येती अन जाती
तो कोणासाठीच न थांबे सदॆव आणि कथती
धुंदीत स्वतःच्या म्हणे पावले माझी चालती
ही निंदा आता मजला न होई सहन
माझ्या वयाचा अंदाजही असे प्रश्न गहन
मी असाच होतो, आहे आणि असणार सदॆव
परी या भौतिकांच्या मते मीच निर्दय
आणि चंचल - काय माझे हे दुर्दॆव!
--------------------------------

No comments: