धुपाचा गंध आणि । सनईचा साज ।
पुष्पांचा सडा । असे दसरा आज ॥
उत्साह मनात । वातावरणी ताज्या ।
नेहमीचाच सूर्य । चैतन्य पाझरे ॥
पावित्र्य दिनाचे । क्षणोक्षणी जाणवे ।
हार पताका । वर तोरण झेंडूचे ॥
पराक्रम राघवाचा । दैत्यावर मात ।
रावणाचे दहन । केलेसि प्रभुने ॥
श्रीखंड पक्वान्न । पुरीवर खीर ।
शेवटी सारे । गोड गोड घडे ॥
सण दशमीचा । सांगतो जनांस ।
करावा उत्सव । विजयाचा ॥
चांगले विचार । नांदावे जगात ।
वाईटा पराभव । अटळ असे ॥
सणाचे महत्त्व । असेचि बहु थोर ।
केवळ उपचार । मात्र अर्थ नसे ॥
आनंदी आनंद । लुटावे सोने ।
आपल्या विचारांचे । व्हावे पिवळे ॥
मंगलदिनी आज । लुटावा धागा ।
आणिक आपण । जोडावा बांधा ॥
अजितच्या शुभेच्छा । सदैव तुम्हाप्रति ।
असलो जरी मी । उगाच उवाच ॥
पुष्पांचा सडा । असे दसरा आज ॥
उत्साह मनात । वातावरणी ताज्या ।
नेहमीचाच सूर्य । चैतन्य पाझरे ॥
पावित्र्य दिनाचे । क्षणोक्षणी जाणवे ।
हार पताका । वर तोरण झेंडूचे ॥
पराक्रम राघवाचा । दैत्यावर मात ।
रावणाचे दहन । केलेसि प्रभुने ॥
श्रीखंड पक्वान्न । पुरीवर खीर ।
शेवटी सारे । गोड गोड घडे ॥
सण दशमीचा । सांगतो जनांस ।
करावा उत्सव । विजयाचा ॥
चांगले विचार । नांदावे जगात ।
वाईटा पराभव । अटळ असे ॥
सणाचे महत्त्व । असेचि बहु थोर ।
केवळ उपचार । मात्र अर्थ नसे ॥
आनंदी आनंद । लुटावे सोने ।
आपल्या विचारांचे । व्हावे पिवळे ॥
मंगलदिनी आज । लुटावा धागा ।
आणिक आपण । जोडावा बांधा ॥
अजितच्या शुभेच्छा । सदैव तुम्हाप्रति ।
असलो जरी मी । उगाच उवाच ॥
No comments:
Post a Comment