Wednesday, May 25, 2005

संवाद

या जगात कुठलीही गोष्ट हा एक संवाद आहे. माझा आणि या blog चा असो - माझा स्वत:शीच असो वा नाटकातल्या पात्रांचा एकमेकांशी - पुस्तकातल्या शब्दांचा वाचकाशी - वक्त्याचा श्रोत्यांशी - ताऱ्यांचा चंद्राशी - सगळ्यांचा एकमेकांशी संवाद चालू असतो. मनात विचारांचे खेळ सदैव चालतात. हाही एक संवादच नव्हे का?

संवादांना देवाणघेवाणीसाठी मूर्त स्वरूप घ्यावं लागतं - शब्द, सूर, रंग, पदलालित्य, ही सगळी संवादाचीच मूर्त रुपे. माध्यमातून होतो तो संवाद.

मला असंच वाटायचं. माझा माझ्याच मनाशी होणारा संवाद सोडला, तर प्रत्येक संवादाला माध्यमाची गरज असावी असा माझा विश्वास होता.

दोन मनांमध्येही संवाद घडू शकतो - माध्यमाशिवाय - ही जाणीव फारच वेगळी आहे - आश्चर्यकारक आहे - आणि त्याचे परिणामही इतर संवादांसारखेच सुंदर आहेत. अशा सुसंगत संवादातून मिळणारा आनंद खूपच वेगळा आहे - आणि कदाचित इतर सगळ्या माध्यमांतून व्यक्त करण्याच्या क्षमतेपलिकडचा आहे. त्यासाठी दोन मनांमधलं अद्रुश्य-अद्भुत माध्यम हवं, हेच खरं!

No comments: