Sunday, April 10, 2005

एकाच भिंतीवर जर अनेक लंबकाची घड्याळे लावलेली असतील; तर थोड्या वेळानंतर सगळ्या घड्याळांचे लंबक एकाच लयीत लवतात! निसर्गात unsynchronised गोष्टींना जागा नाही. सगळ्या गोष्टींना काहितरी purpose आहे - काहीतरी प्रयोजन आहे - काहीतरी विशिष्ट proportion - प्रमाण आहे.

निसर्गातल्या बऱ्याचशा गोष्टींची शास्त्रीय कारणे देऊन स्पष्टीकरणे देता येतील. परंतु मूळ प्रश्नाचे - 'या सगळ्या गोष्टी इथे का आहेत याचं उत्तर येईल देता?