Saturday, April 30, 2005

Surprising

"गायीचा आपल्याच शेणात फसला पाय!", अशी ओळ असलेली एक कविता वाचून लहानपणी मला फार मजा वाटायची.

आज याची आठवण येण्याचे कारण म्हणजे कालचे IISc तल्या सापांवरचे presentation! Presentation च्या शेवटी प्रश्नोत्तरांमध्ये एक प्रश्न आला :
"सापाला स्वत:चेच विष बाधत नाही का? तुम्ही तर म्हणालात की समुद्र-साप चावा घेउन मासे मारतात आणि त्यांचे भक्ष बनवतात."

आणि उत्तर आलं:
"सापाच्या सगळ्याच जाती स्वत:च्या विषापासून स्वत:चा बचाव करू शकत नाहित. काही जातींकडे मात्र ही क्षमता असते. सापाचं विष रक्तात मिसळलं तरच ते प्राणघातक ठरतं. माणसानं सापाचं विष प्यायलं तर त्याला काहिही होणार नाही. समुद्र-सापांच्या बाबतीत तर मासे मारण्यासाठी वापरलेलं विष त्यांना पचनासाठी उपकारकच ठरतं."

"'क्ष' जातीच्या सापाची स्वत:चा चावा घेऊन आत्महत्या" अशी बातमी उद्या वाचायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.
---
एक अलिकडेच ऐकलेला साप(की साफ?)-विनोद:
एक नाग अचानक समोर येतो आणि आपला फणा उगारतो. आपण सर्वांनी या क्षणी आश्चर्यचकित होणं अपेक्षित आहे. का?

कारण ते खरोखर surprising आहे. "सर्प"-rising

खो खो खो! :):):):)

No comments: