Monday, November 15, 2004

वाह!

Ustaad Rashid Khan


मी त्या काही हजार भाग्यवंतांपॆकी एक आहे, ज्यांनी काल संध्याकाळी एक अपूर्व पर्वणी साधली. राग "श्री", त्यानंतर चिरकालीन "यमन" अक्षरशः कोसळला. मध्यंतरानंतरच्या "दरबारी"ने तर सगळ्यांना वेड लावले. मी शास्त्रीय संगीताचा काही सखोल अभ्यासक किंवा जाणकार नाही; परंतु जे थोडे जाणतो, त्या बळावर सांगतो, असा performance मी माझ्या आयुष्यात आधी कधीच ऎकला नव्हता, आणि पॆज लावतो की श्रोत्रुवर्गातले किमान २०-२५% लोक माझ्याशी सहमत असतील. जवळ पास नसतांनाही केवळ hope floats म्हणून गेलो आणि धन्य-धन्य होऊनिया परत आलो.

सकाळी उठलो तेव्हाही मनात दरबारीचे सूर होते - आपसूक उद्गारलो - "वाह उस्ताद क्या बात हॆ!"

No comments: