Friday, August 13, 2004

खेळ मांडियेला!

ग्रीकांची नगरी । जाहली अमर ।
बघण्यास खेळ तो । लोटतो सागर ॥

युद्धेही थांबती । जळे एकच ज्योत ।
विविध स्पर्धांची । नौबत झडे ॥

मनी एकच ध्यास । ऎकावे राष्ट्रगीत ।
सुवर्णाचे पदक । देशास अर्पावे ॥

तारा तो एकच । सदॅव समोर ।
मनात विश्वास । कायम वसे ॥

कधी अपयश । त्यांस न येई ।
ज्याने पराक्रम । थोर केला ॥

पराक्रमा अंती । पाडाव जरी जाहला ।
जीवनी त्याचा । तो विजयच असे ॥

जिंकेल जो मना । त्यास खेळाडू माना ।
नित्य खेळ मांडा । अजित म्हणे ॥

-------------------------------------------

No comments: